पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर १६ दिवसांनंतर भारताने ७ एप्रिल रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानच्या सीमेवरील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. दरम्यान, बहावलपूरमधील जैशच्या हेडकॉर्टरचा एक नवा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ऑपरेश सिंदूर दरम्यान बहावलपूरच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला कऱण्यात आला होता. याच नव्या व्हिडीओमध्ये कशा प्रकारे जैशच्या हेडकॉर्टर उद्ध्वस्त झालंय हे दिसतंय.
पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूर .येथील मरकज सुभान अल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल हेडकॉर्टर होते. पुलवामा हल्ल्याचा कट याच मरकजमध्ये सुमारे ६ वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी रचण्यात आला होता. केवळ पुलवामाच नाही तर इतर अनेक दहशतवादी कटही याच मरकजमधून रचण्यात आले होते. पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना याच कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. तोच अड्डा भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आलाय.