Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी तुरुंगातील उंदराची एक खास कथा सांगितली. विशेष म्हणजे या उंदाराचं नामकरण करण्यात आल्याचंही सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
एकदा तुरुंगात उभे होतो. तेव्हा पाहिलं. म्हटलं ससे कुठून आले. कुंदन शिंदे म्हणाले, साहेब उंदीर नाही. ससा आहे. सश्यासारखे उंदीर आणि धिप्पाड आहे. देशमुखांनी त्यांना नावे ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं योग्य नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मर्यादा पाळल्या पाहिजे. त्यातून पुस्तक आलं.
दर दिवशी माझं एडिट रोज बाहेर यायचं. सरकारने चौकशी लावली. माझं रोखठोक येत होतं. मी खूश होतो. कारण माझं काम होत होतं. आतल्या गोष्टी आतच बऱ्या. या कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस खचत नाही. कारण आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलं. त्यांनी तीच शिकवण दिली खचू नका.
मी कोठडीत होतो. आणि सरकारवर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. संजय राऊत तुरुंगात आहेत. पण रोखठोक प्रसिद्ध कसं झाले. दोन अधिकारी आले. त्यांनी रात्री उठवलं. चौकशी सुरू केली. मी राज्यपालांवर लिहिलं होतं. म्हटलं मी आधीच लिहून आलो होतो. म्हटलं मला माहीत होतं ते घाण करणार आहेत. मी म्हटलं तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे. तुम्ही चेक करा.
साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढले होते. तो साबरमतीच्या तुरुंगात सात महिने होता. त्याला विमानतळावरून उचललं. आमचा अनुभव तुरुंगातला कमी आहे. तो मला ज्येष्ठ आहे. ८० टक्के पुस्तक तुरुंगात लिहिलं. २० टक्के लिहायला दोन वर्ष झाली.
आम्ही कसाबच्या बॅरकमध्ये राहिलो. ती बॅरक जयंत पाटलांनी केली होती. त्याची डिझाईन त्यांनी बनवली. आणि नंतर आम्हाला आत पाठवलं. नंतर जयंत पाटील म्हणाले, कसा होता बॅरक. मीच बनवला आहे. कटू आठवणी असतातच. त्या कटू म्हणून घ्यायच्या नाही. तो अनुभव म्हणून घ्यायचा.
मी उद्धव ठाकरेंना म्हटलं कसं आहे पुस्तक. म्हणाले, मी भाषणात सांगतो. ते म्हणाले, एका वाक्यात सांगतो पुस्तकात रडगाण नाही.
मला अटक केली त्याला पश्चाताप झाला. साला झक मारली आणि याला पकडलं. आम्ही गुंडे आहोत. आम्ही तुरुंगात जायला घाबरत नाही. देशाला अशाच लोकांची गरज आहे. लोहा लोह्याला कापतो.