पंजाब किंग्सला एक चुकीचा चांगलाच फायदा झाल्याचं दिसत आहे. खरं तर एखादी चूक करणं खूपच महागात पडते. पण पंजाब किंग्सच्या पथ्यावर ही चूक पडली आहे. प्रीति झिंटाने केलेल्या चुकीमुळे सर्वात आधी पश्चाताप झाला होता. मात्र हीच आता संघाच्या फायद्याची ठरताना दिसत आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मिनी लिलाव पार पडला होता. 19 डिसेंबर 2023 रोजी बोली लागली होती. तेव्हा लिलावात 19 वर्षीय खेळाडूऐवजी चुकून 32 वर्षांच्या शशांक सिंहला विकत घेतलं. नाव साधर्म्य असल्याने हा घोळ झाला. पंजाब किंग्सने शशांकला संघात घेतल्यानंतर ही बाब कबूल केली होती. पण तेव्हा केलेली चूक पंजाब किंग्ससाठी आता फायदेशीर ठरत आहे. पंजाब किंग्सने 2025 मेगा लिलावापूर्वी शशांक सिंहला रिटेन केलं. कारण आयपीएल 2024 स्पर्धेत त्याने 44.25 च्या सरासरीने आणि 164.65 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्यामुळे पंजाब किंग्स फ्रेंचायझीला यंदाच्या पर्वात त्याच्याकडून अपेक्षा होत्या. या अपेक्षा आता खऱ्या होताना दिसत आहेतय
शशांक सिंह एक फिनिशर म्हणून जबरदस्त भूमिका बजावत आहे. पंजाब किंग्सला सामना जिंकून देण्यात आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 68.25 च्या सरासरीने आणि 151.66 च्या स्ट्राईक रेटने 273 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच काय तर 18 मे रोजी पार पडलेल्या पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यात संघाचं नेतृत्वही केलं. श्रेयस अय्यरच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला नाही. तेव्हा शशांक सिंहने कर्णधारपद भूषवून विजय मिळवून दिला. इतकंच काय तर मॅनेजमेंटचा विश्वासही जिंकला. त्यामुळे प्रीति झिंटाने ऑक्शन टेबलवर केलेली चूक संघासाठी फायद्याची ठरली आहे.
पंजाब किंग्सने 12 सामन्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. एक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवला आणि एक गुण वाटेला आहे. त्यामुळे 17 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीपेक्षा नेट रनरेट कमी असल्याने तिसऱ्या स्थानावर आहे. आता टॉप दोनमध्ये जागा निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.