प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आता नवीन मालिका येणार आहे. तिच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही एक थरारक सीरिज आहे. याचा ट्रेलर नुकताच 'झी मराठी' आणि 'झी 5' ने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या सीरिजमध्ये मराठी सृष्टीतील लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत.
नवीन थरारक सीरिजचे नाव 'अंधार माया' (Andhar Maya Trailer ) असे आहे. 'अंधार माया' या सीरिजचे दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केलं आहे. तर शर्मिष्ठा आणि तेजस देसाई सीरिजची निर्मिती करणार आहे.
'माया' च्या ट्रेलरला हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "सापळ्यात अडकत जाणार, भटकत जाणार, प्रश्न पडत जाणार, एका मागोमाग एक गोष्टी घडत जाणार..." या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुटुंब अंतिम विधी कार्यासाठी पूर्वजांच्या वाड्यात एकत्र येते आणि हा भयानक खेळ सुरू होतो.
कोकणातील या वाड्यात विचित्र घटना घडताना दिसत आहे. जुनी गुपितं आता उलघडताना दिसत आहेत. या वाड्यात नेमकं काय घडले होते आणि आता पुढे काय घडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
'अंधार माया' कुठे आणि कधी पाहाल?नवीन 'अंधार माया' ही सीरिज तुम्ही Zee5 वर पाहू शकता. या थरारक सीरिजचा प्रीमियर 30 मे रोजी 'झी 5' वर पाहता येणार आहेत.
'अंधार माया' स्टारकास्ट'अंधार माया' सीरिजमध्ये किशोर कदम, ओमप्रकाश शिंदे, अनुप बेलवलकर, ऋतुजा बागवे, स्वप्नाली पाटील, शुभंकर तावडे असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.