नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला आहे. आता पुढे काय करायचा हा मोठा यक्ष प्रश्न अनेक घरात सध्या धुमाकूळ घालत आहे. कला शाखेत जायचे की, विज्ञान? वाणिज्य शाखेत करिअर करावे का, असे प्रश्न विद्यार्थीच नाही तर पालकांच्या भोवती पिंगा घालत आहे. तुम्हाला जर हटके करिअर करायचे असेल आणि कमाई करता करता शिकायचे असेल तर हे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स, पदविका आणि प्रमाणपत्र कोर्स उपयोगी पडू शकते. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते. तर काही जण स्वतः सुद्धा काही तरी करू शकतात. कमाई सुरू होऊ शकते. अर्थात तुमची आवड निवड, तुमचा पिंड, तुमची क्षमता, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांच्या परिपाकातून तुम्ही निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.
कला शाखेतील पदविका अभ्यासक्रम (Arts Diplomas after 10th)
फाइन आर्ट्स डिप्लोमा
फॅशन डिझायनिंग डिप्लोमा
पत्रकारिता डिप्लोमा
फोटोग्राफी डिप्लोमा
डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा
डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट
ललित कला मध्ये डिप्लोमा
कमर्शियल आर्ट्स मध्ये डिप्लोमा
ग्राफिक डिझायनिंग मध्ये डिप्लोमा
सोशल मीडिया मॅनेजमेंट डिप्लोमा
स्पोकन इंग्लिश मध्ये सर्टिफिकेट कोर्स
फंक्शनल इंग्लिश मध्ये सर्टिफिकेट कोर्स
मानसशास्त्र डिप्लोमा
वाणिज्य शाखेतील पदविका अभ्यासक्रम (Commerce Diploma after SSC)
टॅलीमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम
बँकिंगमध्ये डिप्लोमा
जोखीम आणि विमा पदविका
संगणक अनुप्रयोगामध्ये डिप्लोमा
वित्तीय लेखा पदविका
ई-लेखा करप्रणालीमध्ये पदविका
डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट
ॲनिमेशनमधील प्रमाणपत्र
विज्ञान शाखेतील पदविका अभ्यासक्रम (Science & Technical Diploma)
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा
अभियांत्रिकी डिप्लोमा
माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
फूड प्रोडक्शनमध्ये हस्तकला अभ्यासक्रम
डिझेल मेकॅनिक्समधील प्रमाणपत्र
डेंटल मेकॅनिक्समध्ये डिप्लोमा
डेंटल हायजिनिस्टमध्ये डिप्लोमा
हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा
डिप्लोमा इन वेब डेव्हलपमेंट
डिप्लोमा इन वेब डिझायनिंग
डिप्लोमा इन गेम डिझायनिंग
डिप्लोमा इन बेकरी आणि कन्फेक्शनरी
डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन मेकअप अॅण्ड ब्युटी
डिप्लोमा इन मरीन अभियांत्रिकी
डिप्लोमा इन ॲनिमेशन
डिप्लोमा इन टेक्सटाईल डिझायनिंग
डिप्लोमा इन लेदर डिझायनिंग
शॉर्ट टर्म सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस (Short-term Courses)
ॲनिमेशनमधील प्रमाणपत्र
3D ॲनिमेशन मध्ये डिप्लोमा
फंक्शनल/स्पोकन इंग्लिशमधील प्रमाणपत्र
मोबाइल रिपेअरिंग कोर्समध्ये प्रमाणपत्र
व्यावसायिक प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा
कॉस्मेटोलॉजीमध्ये डिप्लोमा
स्टेनोग्राफीमध्ये डिप्लोमा
लेदर टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा