‘कामगार योजनां’चे
राजापूरात नोंदणी शिबिर
राजापूर ः कामगार कल्याण विभागाकडील योजनेसाठी नवीन अर्ज नोंदणी आणि केवायसी तपासणीसाठी आमदार किरण सामंत यांनी राबवलेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. राजापूर शहरातील नगर वाचनालय येथे आमदार सामंत यांच्यावतीने शासनाच्या कामगार कल्याण योजनेचा शहरातील गोरगरीब कामगारांना लाभ मिळावा, या उद्देशाने नोंदणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये केवायसी नोंदणी १५८ व नवीन अर्ज नोंदणी २५ इतकी झाली आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुकाप्रमुख दीपक नागले व महिला शहरप्रमुख हर्षदा खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख सौरभ खडपे, महिला उपशहरप्रमुख भाग्यश्री चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घेतली.