CSK vs RR : वैभव सूर्यवंशीची निर्णायक खेळी, राजस्थानचा शेवट गोड, चेन्नईवर 6 विकेट्सने मात
GH News May 21, 2025 02:04 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 62 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 17 बॉलआधी 4 विकेटसच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. राजस्थानने हे आव्हान 17.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. तसेच राजस्थान या मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात यशस्वी ठरली. वैभव सूर्यवंशी हा राजस्थानच्या विजयाचा मुख्य नायक ठरला. वैभव सूर्यवंशी याने राजस्थानच्या विजयात सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानसाठी वैभवने 33 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 57 रन्स केल्या. वैभवचं ही आयपीएल कारकीर्दीतील पहिलवहिलं अर्धशतक ठरलं. कर्णधार संजू सॅमसन याने 31 बॉलमध्ये 132.26 च्या स्ट्राईक रेटने 41 रन्स केल्या. संजूने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर खेचले. ओपनर यशस्वी जयस्वाल याने 19 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 36 धावांचं योगदान दिलं. रियान पराग 3 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर या जोडीने राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं. ही जोडी नाबाद परतली. ध्रुव जुरेल याने 12 बॉलमध्ये 258.33 च्या स्ट्राईक रेटने 31 रन्स केल्या. जुरेलच्या इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. तर शिमरॉन हेटमायरने 5 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 12 रन्स केल्या.

पहिल्या डावात काय झाल?

त्याआधी राजस्थानने टॉस जिंकला. कर्णधार संजूने चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 187 रन्स केल्या. चेन्नईसाठी ओपनर आयुष म्हात्रे याने सर्वाधिक धावा केल्या. आयुषने 20 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्ससह 43 रन्सची खेळी केली. डेवाल्ड ब्रेव्हीस याने 42 रन्स केल्या. ब्रेव्हीसने या दरम्यान 3 सिक्स आणि 2 फोर ठोकले.

राजस्थानचा आयपीएल 2025 मधील शेवट विजयाने

शिवम दुबे याने 32 चेंडूत 39 धावा केल्या.दुबेने 2 चौकार आणि 2 चौकार लगावले. तर कर्णधार धोनी याने 16, आर अश्विन याने 13 तर डेव्हॉन कॉनव्हेने 10 धावा केल्या. तसेच अंशुल कंबोज याने 5 आणि नूर अहमद 2 धावा करुन नाबाद परतले. राजस्थानसाठी युद्धवीर सिंह आणि आकाश मढवाल या दोघांनी प्रत्येकी आणि सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर वानिंदु हसरंगा आणि तुषार देशपांडे या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.