सध्या आयपीएलचा 18वा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. दरम्यान यंदाच्या प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. त्यामध्ये गुजरात टायटन्सचा (GT) समावेश आहे, ज्यांनी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांनी अद्याप विजेतेपद जिंकलेले नाही. चौथ्या स्थानासाठी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात लढत आहे. त्यामुळे आता दिग्गजांनी देखील यावेळी आयपीएल कोण जिंकेल याबाबत भविष्यवाणी करायला सुरुवात केली आहे?
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएल 2025 मध्ये समालोचन करणारे नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आयपीएल 2025 चे विजेतेपद कोण जिंकेल याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांनी श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचे कौतुक केले आणि त्यांना जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले.
नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, श्रेयस अय्यर आणि रिकी पॉन्टिंगच्या या संघाने ते केले जे त्यांच्याकडून कोणीही अपेक्षा केली नव्हती. त्यांचा असा विश्वास आहे की या संघाला कमी लेखले जात होते परंतु त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
सिद्धू म्हणाले, “संघात तेच खेळाडू आहेत, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, नेहल वधेरा. प्रियांश आर्य नुकताच लीगमधून येत आहे. त्यामुळे त्याला आत्मविश्वास देऊन तो सामना जिंकणारा खेळाडू बनला आहे. आज तुम्हाला नेहल वधेराची 180 च्या स्ट्राईक रेटसह 70 धावांची अद्भुत खेळी आणि त्यासोबत शशांक सिंगची खेळी दिसते. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये वेगवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच बनत आहेत. याचा अर्थ यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.”
वधेराने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 37 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 70 धावा केल्या होत्या. तर शशांकने 30 चेंडूत 59 धावा केल्या होत्या.
नवजोत सिंग सिद्धू पुढे म्हणाले, “पंजाब किंग्ज केवळ पुढे आले नाहीत तर विजेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार देखील आहेत. मला खात्री आहे की पंजाब किंग्ज टॉप 2 मध्ये जाईल, त्यांच्यासोबत दुसरा संघ आरसीबी किंवा गुजरात असेल. आणि टॉप 2 पैकी फक्त एकच संघ विजेता ठरेल. 2011 पासून, जेतेपद जिंकणाऱ्या प्रत्येक संघाने टॉप 2 मधून विजय मिळवला आहे. हैदराबाद 2016 मध्ये फक्त एकदाच जिंकला होता, जो टॉप 2 मध्ये नव्हता. कारण तुम्हाला सतत 3 सामने जिंकायचे असतात, तुम्हाला सतत प्रवास करावा लागतो.”
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, यावेळी पंजाब संघ उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. यापूर्वी, संघाने 2014 मध्ये शेवटचा प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, तेव्हापासून संघ लीग टप्प्यातून सतत बाहेर पडला आहे. 2014 मध्ये, संघ फायनलमध्ये पोहोचला होता परंतु, केकेआरकडून विजेतेपदाचा सामना गमावला होता. आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्ज फक्त दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. 2014 पूर्वी, 2008 मध्ये संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता