DLF Q4 Results : भागधारकांना मिळणार ६ रुपये लाभांश, मार्च तिमाहीत नफा वाढल्याने शेअर्स तेजीत
ET Marathi May 21, 2025 01:45 AM
मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीएलएफ लिमिटेडच्या शेअर्समध्ये मंगळवारी (२० मे) सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास ५ टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी-मार्च तिमाहीतील चांगल्या निकालांमुळे (DLF Q4 Results) आणि कंपनीने लाभांश जाहीर केल्याने शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. शेअर्स ७६४.३५ रुपयांवर पोहोचला आहे. बीएसईवर डीएलएफचे शेअर्स १९ मे रोजी ३ टक्क्यांनी वाढून ७३७.४० रुपयांवर बंद झाले.डीएलएफच्या बोर्डाने आर्थिक वर्ष २०२५ साठी शेअरधारकांना प्रति शेअर ६ रुपये लाभांश (DLF dividend) देण्याची शिफारस केली आहे. कंपनीने २०२४ च्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ५ रुपये अंतिम लाभांश दिला होता. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य २ रुपये आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत डीएलएफ लिमिटेडचा निव्वळ एकत्रित नफा वार्षिक आधारावर ३९ टक्क्यांनी वाढून १,२८२.२० कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी नफा ९२०.७१ कोटी रुपये होता. ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल ३,१२७.५८ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षीच्या २,१३४.८४ कोटी रुपयांपेक्षा महसल ४६.५ टक्क्यांनी जास्त आहे. मार्च २०२५ च्या तिमाहीत कंपनीचा खर्च २२९५.१० कोटी रुपये होता. मार्च २०२४ च्या तिमाहीत हा आकडा १,५ लाख ५.११ कोटी रुपये होता.संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी डीएलएफचा एकत्रित महसूल ७९९३.६६ कोटी रुपये नोंदवला गेला. एक वर्षापूर्वी हा आकडा ६,४२७ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २४ मध्ये २७२७.०९ कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफा ४३६७.६२ कोटी रुपये झाला. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५ साठी कंपनीच्या विक्री बुकिंगने २१,२२३ कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. हे २०२३-२४ आर्थिक वर्षातील १४,७७८ कोटी रुपयांपेक्षा ४४ टक्के जास्त आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने डीएलएफला खरेदी रेटिंग देऊन आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला आहे. कंपनीच्या 'द डाहलियास' प्रकल्पाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळाले असा ब्रोकरेजचा विश्वास आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.