रेशमी आणि चमकदार केसांसाठी भेंडीचा असा बनवा हेअर मास्क
GH News May 21, 2025 06:09 PM

आपल्यापैकी अनेकांना केसांच्या समस्या उद्भवतात. त्यात ज्या लोकांचे केस कुरळे असतात त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी बहुतेकजण बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरत असतात. पण त्यांचा फारसा काही फरक जाणवत नाही, तर त्यांचे दुष्परिणाम लगेच दिसून येतात. अशातच काहीजण हे घरगुती उपाय करण्यास सुरूवात करतात. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला उपाय करायचे असतील तर भेंडी तुमच्या केसांसाठीही वरदानापेक्षा कमी नाही. उन्हाळ्यात बाजारात पूर्णपणे हिरवी आणि ताजी भेंडी उपलब्ध असते. तुम्ही ते भाजी म्हणून खात असाल पण एकदा केसांसाठी वापरून पहा, केसांशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते. भेंडी वापरून तुम्ही तुमचे केस गुळगुळीत आणि रेशमी बनवू शकता.

तुम्ही तुमच्या केसांसाठी भेंडीचा जेल वापरू शकता. ज्यामुळे केस तुटणे, केस गळणे आणि निस्तेजपणाची समस्या कमी होते. केस मऊ आणि रेशमी बनवण्यासाठी तुम्ही भेंडीचा वापर अनेक प्रकारे करू शकता. त्याबद्दल आपण जाणून घ्या.

केसांसाठी भेंडी वापर कसा करावा

रेशमी आणि कोरड्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही 8 ते 10 भेंडी घ्या, नंतर त्यांचे देठ काढून गोल आकारात कापून घ्या. एका पॅनमध्ये 1 कप पाणी घ्या आणि ते गरम करण्यासाठी ठेवा. नंतर या पाण्यात चिरलेली भेंडी टाका. भेंडी मध्यम आचेवर शिजवण्यासाठी ठेवा. 10 मिनिटांनी गॅस बंद करा आणि त्यातून निघणारे जेल थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करा. नंतर या मिश्रणात 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका आणि सुमारे 2 चमचे नारळ तेल मिसळा. सर्व गोष्टी मिक्स करून नंतर केसांना लावा. ते केसांवर कमीत कमी 45 मिनिटे ठेवा आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. भेंडी आणि पाण्यापासून बनवलेला हेअर मास्क वापरल्याने केस गुळगुळीत आणि चमकदार होण्यास मदत होईल. तुम्ही भेंडीपासून बनवलेला हेअर मास्क लावून घरी केराटिन ट्रीटमेंट करू शकता. यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतील.

भेंडीपासून बनवलेल्या हेअर मास्कचे फायदे

केस मऊ आणि चमकदार होतात

तुम्हीही कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही घरीच यापासून मुक्तता मिळवू शकता. तुम्ही तुमच्या केसांवर भेंडीपासून बनवलेला हेअर मास्क लावू शकता, ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि गुळगुळीत होतील.

केसांच्या वाढीस मदत करते

भेंडी तुमच्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. म्हणून तुम्ही ते तुमच्या हेअर केअरचा एक भाग बनवू शकता. यासाठी तुम्हाला केसांच्या लांबीवर भेंडीपासून बनवलेला हेअर मास्क किंवा जेल लावावा लागेल आणि नंतर 30 ते 40 मिनिटांनी सौम्य शाम्पूने केस धुवावे लागतील. यामुळे केस निरोगी होतील. पण आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसांनी ते लावले तर त्यांचा फरक तुम्हाला जाणवेल.

केस गळतीपासून आराम मिळतो

तुम्हाला जर केस गळतीची चिंता असेल तर भेंडीपासून बनवलेला हेअर मास्क नक्कीच वापरून पहा. यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या केसांच्या वाढीस मदत करतात आणि केस गळतीची समस्या मुळापासून दूर करतात. तुम्ही आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरू शकता. तुमचे केस जाड आणि लांब होतील. पण त्याआधी, पॅच टेस्ट करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.