सोन्याच्या किंमती: सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा मोठा फटका सोन्याची खरेदी करणाऱ्यांना बसला आहे. 22 एप्रिल रोजी सोन्याच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
आज बुधवार (21 मे) 24 कॅरेट सोने 9742 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 8930 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 7303 रुपये आहे. सोन्याने नेहमीच कोणत्याही परिस्थितीत महागाईवर मात करून स्वतःला सिद्ध केले आहे. म्हणूनच सुरक्षित गुंतवणुकीच्या बाबतीत ते सर्वात योग्य मानले जाते.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज 18 कॅरेट सोने 7319 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते, तर एक दिवस आधी ते 7139 रुपयांना विकले जात होते. त्याचप्रमाणे, दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 8945 रुपयांवर आहे, एक दिवस आधी तो 8725 रुपयांवर विकला जात होता. आज दिल्लीत 24 कॅरेट सोने 9757 रुपयांना विकले जात आहे. तर एक दिवस आधी बाजारात ते 9517 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात होते. जर आपण आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोललो तर, येथे 18 कॅरेट सोने 7303 रुपये दराने विकले जात आहे. एक दिवस आधी ते बाजारात 7127 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध होते. आज मुंबईत 22 कॅरेट सोने 8930 रुपयांना विकले जात आहे, तर एक दिवस आधी ते बाजारात 8710 रुपयांना विकले जात होते. 24 कॅरेट सोने 9742 रुपयांना उपलब्ध आहे, तर एक दिवस आधी त्याची किंमत 9502 रुपये होती. बंगळुरुमध्ये 18 कॅरेट सोने तिथे 7307 रुपयांना विकले जात आहे, एक दिवस आधी ते 7127 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. 22 कॅरेट सोन्याचा भाव 8930 रुपयांना मिळत आहे, तर एक दिवस आधी तो 8710 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 9742 रुपयांना विकले जात आहे, एक दिवस आधी ते बाजारात 9502 रुपयांना विकले जात होते.
भारतीय समाजात सोन्याला विशेष महत्त्व आहे. लग्न असो किंवा इतर कोणताही शुभ प्रसंग असो, सोने शुभ मानले जाते. यासोबतच, भारतीय समाजात सोने हे कोणत्याही कुटुंबासाठी समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय किमती आणि डॉलरमधील चढउतारांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..