Ramayan Movie: नमित मल्होत्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणारी ‘रामायण’ सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांना उत्कंठेने वाट पाहाव्या लागणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. अव्वल दर्जाचे अभिनेते, जागतिक दर्जाची VFX टीम, भव्य सेट्स आणि दमदार स्टारकास्टसह हा चित्रपट एक भव्य व्हिज्युअल आणि भावनिक अनुभव देणारा ठरणार आहे.
चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, तर यश रावण या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, इतक्या मोठ्या टक्करनंतरही हे दोन्ही सुपरस्टार्स बहुधा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार नाहीत – आणि हेच या कथानकातलं एक रंजक वळण आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, "दिग्दर्शक नितेश तिवारी आणि टीमने वाल्मीकि रामायणच्या मूळ ग्रंथानुसार चित्रपटाची मांडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ कथा पाहिल्यास, राम आणि रावण यांची कहाणी स्वतंत्रपणे मांडण्यात येते. त्यांचं प्रत्यक्ष आमना-सामना फक्त शेवटच्या युद्धातच होतं."
हा क्रिएटिव्ह निर्णय रामायणाच्या मूळ आत्म्याशी नातं ठेवतो. राम आणि रावण – एक सत्य, धर्म आणि सद्गुणांचं प्रतीक, तर दुसरा अहंकार आणि अतीशक्तीचं प्रतिनिधित्व करतो. त्यांच्या स्वतंत्र प्रवासामुळे कथानकात खोलपणा येतो आणि जेव्हा ते समोरासमोर येतात, तेव्हा तो क्षण अधिक परिणामकारक आणि प्रभावशाली ठरतो.
यश, साई पल्लवी (सीता) आणि सनी देओल (हनुमान) यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या सीनमध्ये दिसणार आहेत, तर रणबीर कपूरचे यशसोबतचे सीन मर्यादित असण्याची शक्यता आहे. यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे रणबीर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव अँड वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी खास लुक तयार केला असून, तो बदलणं शक्य नाही. त्यातच ‘रामायण’च्या शूटिंगला उशीर झाल्यामुळे रणबीरचा शेड्यूल अडचणीत आला आहे.
सध्या ‘’ची शूटिंग भव्य सेट्सवर सुरू असून, हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे – पहिला भाग दिवाळी २०२६, आणि दुसरा दिवाळी २०२७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ने आपले सीन्स आधीच पूर्ण केले असून, यशने मई महिन्याच्या सुरुवातीस उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेऊन शूटिंगला सुरुवात केली आहे.