''बायना का आयना'' उद्या सावंतवाडीत
esakal May 22, 2025 11:45 PM

swt2214.jpg
65609
‘बायना का आयना’ नाटकातील एक क्षण (संग्रहित)

‘बायना का आयना’
उद्या सावंतवाडीत
सावंतवाडी, ता. २२ ः वेश्या व्यवसायाच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारे दोन अंकी मराठी नाटक ‘बायना का आयना’ शनिवारी (ता. २४) सावंतवाडीत तर रविवारी (ता. २५) कुडाळ येथे आयोजित केले आहे. सिमेन्स सांस्कृतिक संस्थेने या नाटकाची निर्मिती केलेली असून नाटकाचे संहिता लेखन व दिग्दर्शन महेश सावंत-पटेल यांनी केले आहे. या नाट्याच्या संहितेला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे नाटक सिंधुदुर्गातील ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या ‘अर्ज मधील दिवस’ या पुस्तकावर आधारित आहे. गोव्यातील ‘बायना’ या एकेकाळच्या रेडलाईट वस्तीत मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेले अनुभव डॉ. पाटकर यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. वेश्या व्यवसायबाबत असलेल्या गैरसमजांना हे नाटक दूर करत प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावते. या नाट्यकृतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.