वसई (बातमीदार) : गौतम नगर गास (निर्मळ) रहिवासी संघातर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यशाबद्दल कौतुकाची थाप मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या कार्यक्रमात गौतम नगरचे अध्यक्ष मंगेश मोहिते, खजिनदार ॲड. राकेश चव्हाण, सचिव हरेश ग. मोहिते, नितीन मोहिते, कुणाल मोहिते, यशवंत चव्हाण, निलेश मोहिते, चंद्रकांत चव्हाण, नरेश तांबे, रघुनाथ मोहिते, समाजसेवक सन्नी डिसोजा यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.