२३ मे २०२५ साठी
शुक्रवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ५.४४, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय पहाटे ३.०६, चंद्रास्त दुपारी ३.०६, अपरा एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४७.
दिनविशेष२००५ : महाराष्ट्राच्या योगेश दोडके (पुणे) याने हरियानाच्या प्रवीणकुमार याला पावणेसात मिनिटांत ‘धोबी’ डावावर चितपट करून कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा हिंदकेसरी किताब पटकाविला.
२०१६ : भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘रियुजेबल लॉँच व्हेइकल’च्या साह्याने अवकाशयानाचे सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण.