Mental Health : ओव्हरथिंकिंग करा कमी जपानी टेक्निक्सनी
Marathi May 23, 2025 05:26 PM

जपानी व्यक्ती या त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जातात. ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य ती काळजी घेतात. म्हणूनच ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. आरोग्य सुधारण्यासाठी अशा अनेक तंत्रांचा अवलंब केला जातो. अतिविचार अर्थात ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी अनेक जपानी टेक्निक्स देखील आहेत. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात अतिविचार कमी करण्यासाठी कोणत्या तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो याविषयी.

सध्या प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आयुष्यात खूप व्यस्त झाली आहे. त्यामुळेच ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. याच कारणामुळे हल्ली काहीजण नैराश्य, जास्त विचार करणे, पॅनिक अटॅक इत्यादी आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःला वेगळी आणि सर्वात कमकुवत समजू लागते. याचा परिणाम केवळ तुमच्या मानसिक आरोग्यावरच नाही तर तुमच्या शारीरिक आरोग्यावरही होतो. जे कमी करणे खूप महत्वाचे आहे.

जर तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल आणि तुमचे मन शांत ठेवू इच्छित असाल तर तुम्ही काही जपानी टेक्निक्स वापरू शकता. तुम्ही त्यांचे पालन कसे करू शकता ? आणि त्या किती प्रभावी आहेत ते पाहू.

ओव्हरथिंकिंग म्हणजे काय?

ओव्हरथिंकिंग या शब्दाचा अर्थ एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे असा होतो. ही सवय तुमचे मानसिक आरोग्य बिघडवते. कारण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत असते आणि तुम्ही त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करता, तेव्हा मानसिक तणाव निर्माण होणे हे साहजिक आहे. हे कमी करण्यासाठी, तुम्ही काही जपानी तंत्रांचा अवलंब करू शकता ज्यामुळे तुमची अतिविचार करण्याची समस्या कमी होऊ शकते.

अतिविचार कमी करण्यासाठी या जपानी टेक्निकचे अनुसरण करा

इकिगाई (जीवनाचा उद्देश जाणून घेणे)
इकिगाई या शब्दाचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचे आहे आणि ते अधिक चांगले करण्यासाठी तुम्ही काय करू शकता. या गोष्टींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुमचे जीवनाचे उद्दिष्ट स्पष्ट राहते आणि तुम्ही आयुष्यात पुढे जात राहता. जेव्हा तुम्हाला काय करायचे आहे हे माहित असेल, तेव्हा तुम्ही त्याबद्दल वारंवार विचार करण्यात वेळ वाया घालवणार नाही.

शिनरीन योकू (फॉरेस्ट बाथ)
शिनरीन योकू हे एक जपानी तंत्र आहे जे तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. याचा अर्थ जंगलात स्नान करणे. या तंत्रात, माणूस निसर्गाच्या जवळ असलेल्या शांत ठिकाणी जातो आणि तिथे बसून ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेत, एखाद्याच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

कैझेन (स्वतःच्या सुधारणेकडे एक पाऊल)
कैझेन ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी काही ध्येये किंवा उद्दिष्टे ठरवता आणि नंतर ती साध्य करण्याचा प्रयत्न करता. हे जपानी तंत्र कोणतेही कठीण काम हळूहळू सुरू करण्यास मदत करते ज्यामुळे अतिविचार कमी होण्यास मदत होते.

वाबी-साबी (अपूर्णता वाईट गोष्ट नाही)
वाबी-साबी हे एक जपानी तंत्र आहे ज्यामध्ये आपण सर्वकाही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, अपूर्ण गोष्टींमध्ये परिपूर्णता शोधण्याचा प्रयत्न करतो. जे काही घडत आहे ते बरोबर आहे अशी तुमची अपेक्षा असते. जास्त विचार करून गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी दबाव निर्माण करू नका आणि दररोज शांततेने जीवन जगण्याचा प्रयत्न करत रहा.

झानसिन (केंद्रित जागरूकता)
झांशिन ही एक जपानी टेक्निक आहे. ज्यामध्ये तुम्ही आयुष्यात काय करावे आणि जीवन कसे जगावे याबद्दल सतर्क आणि जागरूक राहता. हे तंत्र तुम्हाला जागरूक राहण्यास मदत करते आणि वर्तमान क्षणाचा आनंद घेण्यास देखील मदत करते.

हेही वाचा : Health Tips : गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वाढू शकतो स्ट्रोकचा धोका


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.