मोशी, ता. २३ : श्री संत तुकाराम महाराज यांच्या संदेह वैकुंठ गमनावर आक्षेपार्ह विधान करणारे बाळकृष्ण जनार्धन गायकवाड तथा वसंत गडकर यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टतर्फे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी वारकरी व भाविक यांचे वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. गडकर यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यावर आधारित आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई शासनाने करावी, अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केली आहे.