
पाकिस्तानने आज हिंदुस्थानच्या उड्डाणांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र 24 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणाऱ्या हिंदुस्थानच्या विमानावरील बंदी 24 जून 2025 रोजी पहाटे 4.59 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने निवेदनात म्हटले. ही बंदी हिंदुस्थानच्या लष्करी विमानांनाही लागू असेल.