उन्हाळ्याचा सीझन सुरू झाल्यापासून अनेकांच्या घरी मोठ्या प्रमाणत आंबे खाल्ले जात आहे. त्यातच या हंगामात आपल्या बाजारपेठेतही आंब्यांचे अनेक प्रकार मिळत असतात. पण प्रत्येक उन्हाळा हा आंब्याशिवाय अपूर्ण वाटतो. आंबा केवळ चवीलाच उत्तम नाही तर त्याला ‘फळांचा राजा’ असेही म्हणतात. गोड, रसाळ आणि सुगंधी आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच खायला आवडतो. या आंब्यांपासून काही लोक रस बनवतात, तर काहीजण मँन्गो मिल्क शेक बनवून पितात. तर काहींना आंबा कापून खायला सुद्धा आवडतो. पण आंबा खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्यातील कोय निरुपयोगी समजून फेकून देतो, पण तुम्हाला माहिती आहे का की ही आंब्याची कोय आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते?
आंब्याच्या कोयमध्ये असलेले पोषक आणि औषधी गुणधर्म आपल्या शरीराचे अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. आयुर्वेदात, आंब्याच्या कोयचा वापर अनेक वर्षांपासून विविध उपचारांमध्ये केला जात आहे. आज या लेखात आपण आंब्याच्या कोयचे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे जाणून घेऊया, जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही ते फेकून देण्यापूर्वी नक्कीच दोनदा विचार कराल.
आंब्याची कोय पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डायरिया आणि लूज मोशन सारख्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी आंब्याच्या कोयची पावडर खूप प्रभावी आहे. हे आतड्यांना बळकटी देते आणि पोट शांत ठेवते. यासाठी बिया वाळवून त्याची पावडर बनवा आणि मधात चिमूटभर ही पावडर घेऊन सेवन करा.
आंब्याच्या कोयमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्ताभिसरण सुधारून आपले हृदय निरोगी ठेवते.
आंब्याच्या कोयचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यात काही संयुगे असतात जे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात आणि शरीरात साखरेचे शोषण संतुलित करतात.
आंब्याच्या कोयपासून बनवलेले तेल केसांसाठी खूप चांगले मानले जाते. हे केसांना मऊ, मजबूत आणि चमकदार बनवते. याव्यतिरिक्त हे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी करते. म्हणजेच ते कोलेजन वाढवण्यासाठी देखील चांगले आहे. आंब्याच्या कोयपासून काढलेले तेल केस आणि त्वचेवर लावता येते.
आंब्याच्या कोयमध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि भूक नियंत्रित करते. याचे नियमित सेवन केल्याने चयापचय गतिमान होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय ही कोय शरीरात फॅट जमा होण्यास प्रतिबंध करते. तुम्ही आंब्याच्या कोयपासून तयार केलेली पावडर पाण्यात मिक्स करून पिऊ शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)