Perfect Sunday Breakfast: झटपट बनवा कुरकुरीत आणि हेल्दी 'रवा टोस्ट', रविवारच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट
esakal May 25, 2025 01:45 PM

How to Make Rava Toast at Home: रविवार म्हणलं डाएटवर चिटी करणं आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं. पण रविवार हा आरामाचा देखील दिवस असल्यामुळे काहीतरी हलके-फुलके खाण्याचा दिवस असतो. रोजच्या नेहमीच्या नाश्त्याला थोडा ब्रेक देऊन काहीतरी चविष्ट, झटपट आणि हेल्दी खायचं असेल, तर रवा टोस्ट एकदम योग्य पर्याय ठरतो.

खास म्हणजे भरपूर भाज्यांनी युक्त हा टोस्ट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रवा टोस्ट कुठल्याही वेळेस सहज बनवता येतो आणि सर्वांनाच आवडतो!

साहित्य
  • रवा - ½ कप

  • दही – ¼ कप

  • पाणी – ¼ कप

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1

  • कांदा, टोमॅटो, शिमला मिरची , गाजर – प्रत्येकी 2–3 टेबलस्पून

  • कोथिंबीर – बारीक चिरलेली

  • साखर – ½ टीस्पून

  • मीठ – चवीनुसार

  • ब्रेड स्लाइस (पांढरी किंवा ब्राउन) – 4

  • हिरवी चटणी – 4 टीस्पून

  • लोणी/बटर – 2 टीस्पून

कृती
  • एका भांड्यात रवा, दही आणि पाणी मिक्स करून गुळगुळीत पीठ तयार करा.

  • त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र मिक्स करा.

  • साखर आणि मीठ घालून हे मिश्रण 10–15 मिनिटं बाजूला ठेवा.

  • ब्रेड स्लाइसवर हिरवी चटणी लावून त्यावर रव्याचं मिश्रण पसरवा.

  • गरम तव्यावर टोस्ट रव्याच्या बाजूने शेकायला ठेवा. वरून लोणी लावावं.

  • रवा कुरकुरीत शेकला गेल्यावर टोस्ट पलटून दुसरी बाजूही खरपूस होईपर्यंत शेकावी.

गरमागरम टोस्ट टुकड्यांमध्ये कापून सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. हा हेल्दी, टेस्टी आणि झटपट असा रवा टोस्ट नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.