swt281.jpg
66725
महेश खानोलकर
मळगाव वाचनालय अध्यक्षपदी
महेश खानोलकर यांची फेरनिवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ः मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष महेश खानोलकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या निवडणुकीमुळे वाचन मंदिराच्या कारभारात सातत्य राहणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली वाचन मंदिराची प्रगती सुरूच राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यकारी मंडळाच्या या त्रैवार्षिक निवडणुकीत खानोलकर यांच्यासह बाबली नार्वेकर, हेमंत खानोलकर, स्नेहा खानोलकर, शांताराम गवंडे, चंद्रकांत जाधव, रितेश राऊळ हे सर्व संचालक बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीसाठी हनुमंत मालवणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी बजावली.
(कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर हे मळगाव परिसरातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. या संस्थेच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. महेश खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही हे कार्य अधिक गतीने सुरू राहील, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.