हवामान विभागाने मुंबईसह उपनगरात पावसाचा अंदाज वतर्वलाय. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. मुंबईतील सेंट्रल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावं लागत आहे. लोकलला येण्यास वेळ येत असल्यानं रेल्वे स्थानकांवर गर्दी जमलीय. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुबंईसह उपनगरात पाऊस सुरू झालाय. ठाण्यात पावसाला सुरुवात झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून २० मिनिटे उशिराने रेल्वे वाहतूक होत आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. आकाशात संपूर्ण काळोख साचला होता. त्यानंतर आता पावसाला सुरुवात झालीय. पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेचं वेळापत्रक विस्कळीत झालंय. ट्रेन उशिराने येत असल्यानं स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे.