भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी आयपीएल 2025 हे पर्व चांगलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत 14 सामन्यात त्याने चांगल्या धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आहे. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात सूर्यकुमार यादवचा मोठा आहे. त्याने साखळी फेरीत चांगल्या धावा केल्या आहेत. त्याच्याकडून प्लेऑफच्या सामन्यातही तशाच अपेक्षा आहेत. असं सर्व असताना सूर्यकुमार यादवची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने वाऱ्यासारखी पसरली आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रावर काही फोटो शेअर केला आहेत. तसेच चाहत्यांसोबत एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. सूर्यकुमार यादवचे वडील अशोक कुमार यादव रिटायर झाले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, ते BARC मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. सूर्याने या खास क्षणी वडील आणि कुटुंबासोबत काही फोटो शेअर केले आहेत. तसेच भावूक पोस्ट लिहिली आहे.
सूर्यकुमार यादवने लिहिलं की, ‘माझ्या पहिल्या आणि कायमच्या नायकाला, आदर्शाला, जीवन पुस्तकाला आणि मार्गदर्शकाला.. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इनिंग संपली आहे आणि तुम्ही प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक सामान्य माणूस ज्याने आपल्याला एक असाधारण जीवन देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या कामगिरीचा आम्हाला किती अभिमान आहे. बाबा, पुढच्या डावासाठी तयार होण्याची वेळ आली आहे, जी थोडी अधिक आरामदायी असेल.’
मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. पण गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असल्याने एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहे. दुसरीकडे, या सामन्यात सूर्यकुमार यादवकडून फार अपेक्षा आहेत. कारण इतर फलंदाजांच्या तुलनेत त्याचा फॉर्म जबरदस्त आहे. त्याने 14 सामन्यात 71.11 च्या सरासरीने 640 धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यत 5 अर्धशतकं ठोकली आहे. तसेच प्रत्येक सामन्यात 25 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.