Amravati Viral Photo Case: जावयाकडून मेहुणीचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल
esakal May 29, 2025 05:45 PM

अमरावती : पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असताना जावयानेच (वय ३२) आपल्या तरुण मेहुणीचे (वय २२) अश्लील फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून तिची बदनामी केली.

आयुक्तालयातील नांदगावपेठ ठाण्यात याप्रकरणी संशयित जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील पीडित असलेल्या तरुणीच्या मोठ्या बहिणीचे संशयितासोबत झाले होते.

पतीला मद्यप्राशनाची सवय असल्यामुळे संशयिताचे पत्नीशी नेहमीच वादविवाद व भांडणे होत होती. त्या त्रासाला कंटाळून संशयिताची पत्नी माहेरी गेली. तेव्हा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पीडित ही तेव्हापासून माहेरी राहते.

एका वापर करून संशयित जावयाने त्याच्या तरुण मेहुणीचे अश्लील फोटो व्हायरल केले. शिवाय स्टेट्सवरही हे फोटो प्रसिद्ध केले. संशयिताच्या मेहुणीला तिच्या मामाने माहिती दिली.

संशयित जावयाकडूनच बदनामीचा प्रयत्न केल्या गेला, असा आरोप पीडित मेहुणीने नांदगावपेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. त्या आधारे जावयाविरुद्ध नांदगावपेठ ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहीस्तोवर संशयित जावयास अटक करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.