Maharashtra Live Updates : फरार होणे निलेश चव्हाणला महागात पडणार; पुणे पोली मोठा दणका देण्याच्या तयारीत
Sarkarnama May 29, 2025 05:45 PM
फरार होणे निलेश चव्हाणला महागात पडणार; पुणे पोली मोठा दणका देण्याच्या तयारीत

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर वादात सापडलेला निलेश चव्हाण याला फरार होणे महागात पडणार आहे. पुणे पोलिसांनी चव्हाण याची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे.

कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात आंदोलन

कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. पाच कोटी रुपये खर्च करूनही गांधी मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे, असा आरोप करत याच पाण्यात आंदोलक बोटी सोडणार आहेत. तसेच क्षीरसागर यांचाही फोटो विसर्जित केला जाणार आहे.

Shivsena News: सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिंदे गटातील प्रवेश रखडला

काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश रखडला आहे. 31 मे रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तो आता 5 जून रोजी होणार आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दिली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

BJP News: पुण्यात भाजप आमदाराला धमकावलं

भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सहकारनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

Maratha On CBSE Board:विरोधात मराठा समाजाची आक्रमक भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सीबीएसई अभ्यासक्रमात केवळ एकच धडा आहे.या सापत्न वागणुकीविरोधात मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीबीएसई बोर्डाविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.पुण्यात मराठा संघटना आपली भूमिका मांडणार आहे.

Central Govt : ओळखपत्र देण्यापूर्वी डेटाबेस तपासा

भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाईचा जोर वाढला आहे. अशातच आता गृह मंत्रालयाने राज्य, केंद्र शासित प्रदेश यांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र तसेच रेशन कार्ड जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ओळखपत्र अथवा दस्तऐवज देण्यापूर्वी अर्जदाराचे नाव बेकायदेशीर स्थलांतरितांच्या डेटाबेसमध्ये आहे की नाही याची चौकशी करण्याचे आणि ते काटेकोरपणे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज मराठवाडा दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 750 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. येथील रामलीला मैदानावर फडवणीसांच्या उपस्थितीत महिला मेळावा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या बैठका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 3,4 आणि 5 जून रोजी मनसेच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत. या बैठकीत विविध विषयांच्या अभ्यासाठी पक्षांतर्गत ज्या समिती स्थापन केल्या होत्या त्या आपला अहवाल सादर करणार आहेत. आगाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे मनसैनिकांना काय सूचना करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis : फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे कौतुक केलं. ते म्हणाले, शरद पवारांच्या अनेक गोष्टी मला आवडतात. त्यांच्या काही गोष्टी मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करतात."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.