वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऑपरेशन शील्ड अंतर्गत आता 31 मे रोजी सीमावर्ती राज्ये पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर तसेच चंदीगडमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. पूर्वी हा नागरिक सुरक्षा अभ्यास गुरुवारी होणार होता, परंतु प्रशासकीय कारणांमुळे तो स्थगित करण्यात आला होता. या राज्यांमध्ये अलिकडेच भारत-पाकिस्तानदरम्यान तीन दिवसांपर्यंत चाललेल्या जोरदार संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा मॉक ड्रिल केला जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारताचे नागरी क्षेत्र आणि धार्मिकस्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.
ऑपरेशन शील्ड अंतर्गत होणाऱ्या मॉक ड्रिलचा उद्देश सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्याच्या तयारींचा आढावा घेणे आहे. यात एनडीआरएफ, स्थानिक पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा सामील होणार आहेत. यावेळचा मॉक ड्रिल आणखी व्यवस्थित आणि व्यवहार्य पद्धतीने लागू केला जाणार आहे, जेणेकरून कुठल्याही आपत्कालीन स्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करता येऊ शकेल असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. ऑपरेशन शील्ड अंतर्गत दुसरा मॉक ड्रिल 31 मे रोजी सीमावर्ती राज्यांमध्ये होणार आहे.