मुंबई पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ
राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण
65 रुग्णांपैकी सर्वाधिक पंचवीस रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती
एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महापालिका, मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवड मध्ये 6, कोल्हापूर मध्ये 2 तर नागपूर मध्ये एक अशी संख्या आहे
तुळजाभवानी मंदिरात पुजा साहीत्याची अनधिकृतपणे विक्रीतुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पुजेचे साहीत्य विक्री करताना 21 पुजेचे ताट व फळांचे कॅरेट जप्त केले आहे.
तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या श्रध्देचा फायदा घेत काही अनाधिकृत विक्रेते मंदिर परीसरात नियमबाह्य पध्दतीने पुजेसाठी लागणारे ओटीचे साहीत्य विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने छापा टाकत कारवाई केलीय.
मंदिर संस्थानच्या वतीने अचानक केलेल्या कारवाईमुळे मंदिरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा तीन ते पाच जून दरम्यान होणारविद्यार्थ्यांना घरबसल्या ही परीक्षा ऑनलाइन देता येणार आहे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेण्यात येणार
नकारात्मक गुण पद्धतीची ही परीक्षा 100 गुणांची आहे
ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार
उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार
Pandharpur: श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान, ७०० वारकऱ्यांचा सहभागपंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष आहे.
श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, हरीनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जपकरीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
एकादशीला भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते.
Amravati: अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई* प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1500 पाकिटे जप्त..
* पिंपळोद येथील प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरी व गोडाऊनवर छापा टाकून धडक कारवाई...
* उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या पथकाची कारवाई...
* या कारवाईत १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
* या प्रकरणी येवदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू..
अकोला शहरातील रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्र प्रकरणी एमआयएमने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनअकोला शहरातील रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्र प्रकरणी एमआयएमने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते..
सुरुवातीला अधिकारी चर्चेस तयार नव्हते, मात्र आंदोलन केल्याने चर्चा केली, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा प्रमाणपत्र मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तातडीने तोडगा निघून प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा एमआयएमने दिला.
दरम्यान, भारतात बांगलादेशी घुसखोर बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे अवैधरीत्या वास्तव्यास असल्याचे भाजप नेत्यांनी आरोप केला होता..
त्यानंतर जन्म व मृत्यू प्रमाण वितरण करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करू नये असे, असे आदेश प्रशासनाचे आहेत.. त्यामुळेच एमआयएम आक्रमक झाली होती..
Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेकडून उधळपट्टी सुरूचनवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ विभागामध्ये सध्या जोरदार उधळपट्टी सुरू आहे अनेक ठिकाणी गरज नसताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेकडून काम काढली जात आहेत तसेच काम करत असताना अनेक प्रकारे झाडांची तोडणी केली जाते तर काही ठिकाणी टेंडर न काढता थेट ठेकेदारांना काम दिली जात आहेत त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर भाजप महिला आघाडीच्या नेत्या मंगला घरत यांनी व्हिडिओतून महापालिकेचा कामाबाबत आवाज उठवला आहे