Ajit Pawar On Jalindar Supekar : जालिंदर सुपेकरांच्या कारभाराची चौकशी होणार? अजितदादा काय म्हणाले?
Marathi June 02, 2025 07:26 PM

Ajit Pawar On Jalindar Supekar : जालिंदर सुपेकरांच्या कारभाराची चौकशी होणार? अजितदादा काय म्हणाले?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातीलस जालिंदर सुपेकर मामांचा नवा कारनामा समोर आलाय..राजेंद्र हगवणेचे मेहुण असलेलेे जालिंदर सुपेकर यांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना हगवणे बंधूंना शस्त्र परवाने तर दिलेच तसंच त्यांच्या कार्यकाळात इतरांनाही मोठ्या प्रमाणात शस्त्रपरवाने दिल्याचं समोर आलंय.. सुपेकरांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना ४०० हून अधिक शस्त्र परवाने दिल्याचं समोर आलंय.. त्यामुळे शस्त्रपरवाने देणं हे अधिकारक्षेत्रात असलं तरी  इतर सर्व 400 जणांची चौकशी होणार का? असा सवाल उपस्थित होतोय..
जालिंदर सुपेकर यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून दोन पोलीस आयुक्तांसोबत काम केलंय.. अमिताभ गुप्ता २० सप्टेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत पुण्याचे पोलीस आयुक्त होते  . तर रितेश कुमार हे १८ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पुण्याचे आयुक्त होते.

दरम्यान लायसन द्यायचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करायचाही आहे… कुणाकुणाला लायसन दिलं याची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.