संजय शिझिस: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असतानाही, केवळ 67 कोटी रुपयांत ते शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तर संजय शिरसाट यांनी देखील संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या पार्श्वभूमीवर VITS हॉटेलचा खरा मालक कोण? ऑक्शनचा नेमका इतिहास काय? याबाबत जाणून घेऊयात…..
विट्स हॉटेल हे रमेश हवेली यांच्या मालकीचे आहे. त्यांनी धनदा कॉर्पोरेशन नावाची कंपनी उभी केली, त्याचे शेअर्स विकले. शेअर्स फोल्डरला परतावा देण्याचे ठरवलं. काही काळ परतावा दिला. त्या नंतर बँक करप्ट झाल्याचं सांगून परतावा देणे बंद केले. शेअर्स होल्डर कडून यासंदर्भात विशेष न्यायालयात तक्रार झाली.शासनाने गॅझेट नोटिफिकेशन करून प्रॉपर्टी अटॅच केली. 2018 मध्ये एमपीआयडी ऍक्ट नुसार त्या भागातील एसडीएम यांची सक्षम अधिकारी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती हॉटेलची लिलाव करण्यासाठी होती.
2018 ला कोर्टाच्या आदेशानुसार पुण्याचे नितीन एम लेले यांच्याकडून प्रॉपर्टीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यावेळी प्रॉपर्टीची किंमत 85 कोटी 92 लाख होती. ही बाजार मूल्य जरी असली तरी प्राप्त करण्यायोग्य मूल्य 64 किती 53 लाख मिळू शकते, असे सांगण्यात आले. यानंतर 2019 ला पहिला लिलाव काढण्यात आला. त्यावेळी रक्कम 76 कोटी होती. या लिलावात कोणीही सहभागी झाले नाही. 2019 ला दुसरा लिलाव काढण्यात आला. त्यावेळी 64 कोटी 53 लाख ही व्हॅल्यू ठेवण्यात आली. या लिलावात देखील कोणी सहभागी झालं नाही. यानंतर 2021 ला 64 कोटी 53 लाख व्हॅल्यूने पुन्हा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. हा या प्रॉपर्टीचा तिसरा लिलाव होता. या लिलावातही कोणी सहभागी झालं नाही
फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा एसडीएम कार्यालयाकडून लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी 64 कोटी 53 लाख रक्कम ठेवण्यात आली. यानंतर पुन्हा ठेवीदाराने कोर्टामध्ये अर्ज केला. यामध्ये प्रॉपर्टीचे दोन हिस्से करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य केली. त्यानंतर हॉटेल समोरील रिकामी जागा आणि हॉटेलची इमारत असे दोन भाग करण्यात आले. हॉटेल लॉनची किंमत 17 कोटी 67 लाख ठेवण्यात आली आणि इमारतीची किंमत 46 कोटी 85 लाख ठेवण्यात आली. यासाठी नोव्हेंबर 2022 ला पुन्हा लिलाव करण्याची नोटीस एसटीएम कार्यालयाकडून काढण्यात आली. या लिलावातही कोणी सहभागी झालं नाही.
यानंतर या प्रकरणात सहावा लिलाव करण्याचा ठरवण्यात आलं. डिसेंबर 2024 मध्ये यामध्येही कोणी बोली लावली नाही. या प्रकरणात मे 2025 ला सातवा लिलाव काढण्यात आला. यावेळी 64 कोटी 53 लाख एवढी किंमत ठेवण्यात आली. या प्रकरणात 20 मे ला लिलाव होणार होता. या लिलावावर स्थगिती आणण्यासाठी मूळ मालक रमेश हवेली यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. सदर प्रॉपर्टीचा कमी किमतीत लिलाव केले जात आहे, त्यामुळे लिलावास स्थगिती देण्यात यावी, असा अर्ज करण्यात आला. त्यावर 20 मे रोजी न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायालयाने रमेश हवेली यांचा अर्ज फेटाळून लावला आणि लिलावाची परवानगी दिली.
यानंतर संजय शिरसाट यांचे मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या सिद्धांत मटेरियल प्रकृमेंट अँड सप्लाईजने रिकाम्या जागेसाठी 17 कोटी 82 लाख 66 हजार आणि हॉटेलसाठी 47 कोटी 56 हजार, असे एकूण 64 कोटी 83 लाख रुपयांची बोली लावली. तर लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम यांनी या प्रॉपर्टीसाठी रिकाम्या जागेसाठी 17 कोटी 77 लाख 66 हजार 408 आणि हॉटेलसाठी 46 कोटी 95 लाख 56 हजार अशी एकूण 64 कोटी 72 लाख एवढी बोली लावली. तर कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी रिकाम्या जागेसाठी 17 कोटी 72 लाख 66 हजार 408 आणि हॉटेलसाठी 46 कोटी 90 लाख 56 हजार 749 अशी एकूण 64 कोटी 62 लाखाची बोली लावली. सर्वाधिक बोली ही सिद्धांत मटेरियल आणि प्रकृतमेन्ट सप्लायर्सची असल्याने त्यांना हे हॉटेल देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी त्यांना बोलीच्या 25 टक्के रक्कम ही महिनाभरात म्हणजे येत्या 21 तारखेपर्यंत भरावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित रक्कम ही 90 दिवसात 75 टक्के भरावी लागेल. त्यावेळी हे हॉटेल त्यांच्या मालकीचे होईल.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..