Who is Adrian Le Roux? New strength coach for India भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह टीम इंडियाचे सदस्य आज साठी रवाना होणार आहेत. २० जूनपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी भारतीय खेळाडू इंग्लंड लायन्सविरुद्ध सराव सामना खेळतील. त्यानंतर भारत अ संघ आधीच इंग्लंडमध्ये आहे आणि त्यातही मुख्य संघातील काही खेळाडू आहे. सराव सामन्यानंतर भारत अ विरुद्ध भारत असाही सराव सामना खेळवला जाणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात ची निवड न होण्यावरून बरीच चर्चा रंगली. श्रेयसने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यात देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. तरीही त्याची कसोटी संघात निवड झाली नाही. पण, आता टीम इंडियात पंजाब किंग्सच्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. पंजाब किंग्सचा हा सदस्य मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंच्या फिटनेसची जबाबदारी सांभाळणारे कोच सोहम देसाई यांनी संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. रवि शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना सोहम देसाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अनेक प्रशिक्षकांबरोबर काम केलं. भारतीय खेळाडूंना फिट ठेवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
सोहम देसाई यांच्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पंजाब किंग्सच्या एड्रियन ली रॉक्स ( Adrian Le Roux ) यांची निवड करण्यात आली आहे. पंजाब किंग्ससोबत त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे आणि आता ते टीम इंडियासोबत काम करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा शास्त्रज्ञ एड्रियन ले रॉक्स यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय संघासोबत काम करण्याचा अल्पावधीचा कार्यकाळ होता.
Le Roux‘s website नुसार , केपटाऊनमधील प्रशिक्षकाला धावणे, सायकलिंग, ट्रायथलॉन आणि अल्ट्रा-एंड्युरन्स इव्हेंट्ससह endurance स्पोर्ट्सची आवड आहे. रॉक्स यांनी पंजाब किंग्ससोबत २०२० पासून काम केले आहे. त्यापूर्वी ते २००८ ते २०१९ या कालावधीत कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझीसोबत होते.
भारताचा संघ - शुभमन गिल ( कर्णधार), रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितिश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.