
पॉन्झी स्कीममधून गुंतवणूकदारांना 91 कोटी 64 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती चक्रावून टाकणारे पुरावे सापडले आणि तक्रारदार पराग शहा हाच आरोपी असल्याची बाब उघडकीस आली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पराग शहाला पुण्यातील नारायणगावातून बेड्या ठोकल्या आहेत.
वर्तकनगर पोलीस ठाण्यात पॉन्झी स्कीममधून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास केला असता त्यात 124 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी राजेश पांभर उर्फ राजूभाई व प्रवीणकुमार वोरा या दोघांना अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा सखोल तप तपास सुरू असताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली. या प्रकरणात तक्रार दाखल करून पोलिसांच्या हातावर तुरी देणारा पराग शहा याचाच गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले. याप्रकरणी जयसुख साखरिया उर्फ पटेल, सुधीर कोटाडिया, रंजन कोटाडिया, अवनितराय बरखालिया उर्फ पटेल, उमंग कोटाडिया, निरू साखरिया हे भामटे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
क्रिप्टो करन्सीचे आमिष; सायबर भामटा गजाआड
क्रिप्टो करन्सीमधून जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराला एक कोटीचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्याला सायबर सेलच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. जुबेर खान (34) असे भामट्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. यामध्ये त्याने गुंतवणूकदारासोबत केलेल्या चॅटिंग आणि संभाषणाचे पुरावे गोळा केले आहेत. जुबेर याने आमिष देणारी पोस्ट फेसबुकवर आमिषाला बळी पडून खारघर पोलीस टाकली. या ठाण्यातच्या हद्दीतील गुंतवणूकदाराने त्याच्यासोबत संपर्क साधला. त्यावेळी जुबेरने खोटे फोटो पाठवून तक्रारदाराची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील यांच्या पथकाने कोणतेही पुरावे नसताना तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने तपास करत जुबेर खान याच्या मुंब्यातून मुसक्या आवळल्या.