मनसेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे यांचा राजीनामा
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी शनिवारी (ता.८) पक्षाचा राजीनामा दिला. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र पक्षप्रवेशाबाबत त्यांनी कोणतीही स्पष्टता व्यक्त केलेली नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी नगरसेवक तुर्डे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. तुर्डे येत्या सोमवारी शिंदे गटात अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविले जात आहे; मात्र अद्याप पर्यंत त्यांनी कोणतीही स्पष्टता व्यक्त केलेली नाही
तुर्डे हे मुंबईतील कालिना विभागातून मनसेचे माजी नगरसेवक राहिले आहेत. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडून आले होते. मनसेच्या विविध उपक्रमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र संजय तुर्डे यांनी पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवली होती. त्यांच्या राजीनाम्याने मनसेला धक्का बसल्याची चर्चा आहे.