जप्तीचा हा सिलसिला सुरूच ठेवत, बीएसएफच्या जवानांनी विश्वासार्ह माहितीच्या आधारे कठोर कारवाई करत, व्यापक शोध मोहीम सुरू केली आणि आज सकाळी एक पिस्तूल यशस्वीरित्या जप्त केले. हे शस्त्र एका बागायती भातशेतात गंजलेल्या अवस्थेत जप्त करण्यात आले. अमृतसरमधील हवेलियान गावाजवळील ही जप्ती घडली आणि काही दिवसांपूर्वी ते टाकण्यात आले असावे असा अंदाज आहे: पीआरओ, पंजाब फ्रंटियर, सीमा सुरक्षा दल
पुण्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनच्या बाबत बैठक सुरू होणार99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीची बैठक सुरू
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यालयात सदस्यांची बैठक सुरू आहे
या बैठकीत यंदाच्या साहित्य संमेलनाचे नियोजन ही करण्यात येणार आहे
मराठ्यांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या राजधानी सातारा येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी 'महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेकडून निमंत्रण पाठवण्यात आले होते
मात्र आज साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर समिती संमेलन स्थळाची घोषणा करणार आहे
Live Update:बिष्णुपूरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलीपूर्व आणि पश्चिम इम्फाळमधील ताज्या दृश्यांमध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रात्री उसळलेल्या हिंसाचाराचे परिणाम दिसून येत आहेत. इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये चार किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बिष्णुपूरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Live : रस्ता नसल्याने गाढवावरून वाहतूकगावापर्यंत वाहन पोहोचत नसल्याने गाढवावरून केली जाते वाहतूक....
एक गोणी खत घेऊन जाण्यासाठी पार करावी लागते दोनशे फूट खोल दरी....
उंच डोंगर पार करत 15 किलोमीटर जंगलातून करावा लागतो गाढवासोबत प्रवास....
वाहतुकीसाठी गाढवासोबतच आदिवासी बांधवांना देखील करावी लागते जीवघेणी कसरत...
दुर्गम भागातील समस्येकडे सरकारचं दुर्लक्ष....
वारंवार मागणी करूनही रस्ता होत गावकरी हताश....
Live : वेंगुर्ले पॉवर हाऊस भागात पाणी साचल्याने नागरिक आक्रमकवेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत पॉवर हाऊस नजीक सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामामुळे पाणी साचून राहीले आहे.
वेंगुर्ले विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर या गटार बांधकामाच्या सुरू असलेल्या कामा मुळे पावसाचे पाणी साचून रोगराई होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. ठेकेदाराने उशिरा काम सुरू केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Washim Live : शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी वाशीम जिल्ह्यात दाखलअत्यंत शिस्तबद्ध पालखी समजल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी वाशीम जिल्ह्यातील मेडशी इथं आगमन झाले.
शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचे अकोला जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात पालखीचा प्रवेश झाल्याने भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले.
यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
पालखीचा आजचा मुक्काम श्रीक्षेत्र डव्हा नंगेनाथ महाराज यांच्या मंदिरास्थळी असणार आहे.
पुढील चार दिवस वाशीम जिल्ह्यात पालखीचा विविध ठिकाणी मुक्काम राहणार असून, त्यानंतर पालखी सोहळा मराठवाड्याच्या दिशेने हिंगोली जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे.
तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य आरोपीला 9 जूनपर्यंत पोलिस कोठडीतुळजापुर येथील ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी विनोद गंगणे याला न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली असली तरी न्यायालयाने सोमवारपर्यंतची कोठडी मंजूर केली. 14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथून ड्रग्ससह तिघांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा मोठा छडा लागला. यामध्ये मुंबई, पुणे आणि सोलापूरशी संबंधित महत्त्वाच्या कनेक्शनचा उलगडा झाला असून आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 17 आरोपी अजूनही फरार आहेत.
बीडमध्ये कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कुख्यात दरोडेखोराला अटकबीड जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर भगवान ईश्वर भोसले याला नागझरी येथून पहाटे दोन वाजता अटक केली. तो आपल्या तिसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी नागझरीला आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. आरोपीने पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या सावधगिरीमुळे तो निष्फळ ठरला. महिलांनीही पोलिसांवर आक्रमक होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या सहकार्याने ही धडक कारवाई यशस्वी झाली.
नागपूर महापालिका प्रशासन आता डिजिटल ट्रकवरनागपूर महापालिकेने दैनंदिन प्रशासकीय कामकाजात ई ऑफिस डिजिटल प्रणालीचा वापर सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागापासून या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या एकूण 48 विभागांमध्ये कागद विरहित कामकाज होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी काही विभागांमध्ये ही प्रणाली लागू केली होती, त्याच धर्तीवर आता नागपूर महापालिकाही डिजिटल ट्रकवर येत आहे. यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार असून, नागरिक आणि अधिकारी दोघांनाही याचा थेट फायदा होणार आहे.
Pune : बस वेळेत सुरू ठेवा, प्रवासी संख्या वाढवा; पीएमपी अध्यक्षांचा आगारप्रमुखांना आदेशवारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे संचलनातील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. परिणामी प्रवाशांना बसची वाट पहावी लागते सर्व मार्गावरील बसची वारंवारता नियोजित वेळेत सुरू ठेवा, असे आदेश पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगार प्रमुखांना दिले आहेत नुकतेच पीएमपीने तिकीट दर वाढविले आहे. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे बस मार्गावर सोडताना देखभाल दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
Raigad : तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणारकिल्ले रायगडावर 9 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील देण्यात आले असून त्यांचा दौरा आला नसला तरी ते देखील येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे. यासह राज्यातील इतर मंत्री, स्थानिक खासदार आणि आमदार यांना देखील निमंत्रण दिल असून हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी शिवप्रेमींनी उपस्थित रहावं असं निमंत्रण मंत्री भरत गोगावले यांनी दिल आहे.
Pune : महसूलनंतर पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर, आकडेवारी आली समोरमहसूल पाठोपाठ पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गेल्या पाच महिन्यात केलेल्या कारवाईतून आले दिसून
एक जानेवारी ते 31 मे पर्यंत महसूल विभागात सहा तर पोलीस विभागात पाच कारवाई
पुणे विभागात मार्च महिन्यात सर्वाधिक सहा गुन्हे लाचखोरी प्रकरणी नोंदवले गेले
भ्रष्टाचारात पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानी महसूल विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असल्याचे आले समोर
पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई मधून आकडेवारी समोर
Raigad : रायगडावर असणाऱ्या धनगर वस्तीला पुरातत्व खात्याच्या नोटीसारायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड रिकामा करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. धनगर समाजाची ही लोक झोपडीवजा घर बांधून गेल्या सात पिढ्यांपासून रायगड किल्ल्यावर रहात आहेत. गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना दही, ताक, चहा, नाष्ट्याची सुविधा पुरवून हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. गडावरील बाजार पेठ आणि जगदीश्वर मंदीरच्या खालच्या बाजूला धनगर समाजाच्या वस्ती असून केंद्रीय पुरातत्व विभागाने ही वस्ती खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
Akola : विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेशअकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महापालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी मोठा निर्णय घेतला. मदन भरगड यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रीवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थित भरगड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Gadchiroli : गोदावरी नदीत ६ मुलं बुडाली, शोध सुरूगडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगणा हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीत सहा मुलं बुडाली आहेत. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडालीय. अंघोळीला गेलेली मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पण मुलं सापडली नव्हती.
Pune News : पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या धडकेनंतर डंपर उलटलापुणे सातारा महामार्गावरील केळवडे येथे कंटेनरची डंपरला धडक बसून अपघात झाला. डंपरचा मागचा टायर फुटल्यानं डंपर उलटला. पुण्याच्या दिशेने जात असताना मालवाहू कंटेरनरने डंपरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर डंपरचा टायर फुटून डंपर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
Pune Rain : पुण्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसमान्सूनची उत्तर सीमा ही स्थिर असून पूर्व विदर्भ ते अंतर्गत कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत द्रोणिका रेषा जात आहे. या प्रभावामुळे पुण्यात रविवारीही वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.