शेअर आहे की रिटर्न मशीन! एका लाखाचे झाले १५ लाख, तज्ज्ञांचा अजूनही बुलीश दृष्टिकोन
ET Marathi June 13, 2025 08:45 PM
Multibagger Stock : शेअर बाजाराबद्दल म्हटले जाते की, गुंतवणूक करा आणि संयम ठेवा. चांगल्या कंपन्या नक्कीच चांगला परतावा मिळवून देतात. Wanbury शेअर्सबाबत दीर्घकालीन गुंतवणूकदारांसोबत असेच काहीसे घडले आहे. अवघ्या ५ वर्षांच्या काळात या कंपनीच्या शेअरच्या किमतींमध्ये १४७५ टक्के वाढ झाली आहे.



जून २०२० मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव १९ रुपये होता. आता कंपनीचा भाव २९९.३५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. च्या शेअर्समधील वाढीमुळे अवघ्या ५ वर्षांत दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे १ लाख रुपये १५ लाख रुपये झाले आहेत.





गेल्या एका वर्षातील कंपनीच्या शेअरचा भावगेल्या एका वर्षात Wanbury च्या शेअरच्या किमतींमध्ये ९३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जून महिन्यात शेअर ४ टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी मे महिन्यात शेअरचा भाव २५.५० टक्क्यांनी वाढला होता. एप्रिलमध्ये १ टक्के आणि मार्च महिन्यात ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.



कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३३० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक १५१.१० रुपये आहे. कोविडच्या काळात कंपनीच्या शेअरचा भाव १८ रुपये होता. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरचा भाव १५६५ टक्क्यांनी वाढला आहे.





कंपनी काय काम करते?Wanbury लिमिटेड ही एक भारतीय फार्मास्युटिकल (औषध निर्माण) कंपनी आहे.

तज्ज्ञांचा तेजीचा दृष्टिकोनWanbury च्या शेअरच्या कामगिरीबद्दल ब्रोकरेज हाऊस व्हेंचुरा सिक्युरिटीज (Ventura Securities) सकारात्मक आहे. या ब्रोकरेज हाऊसने या शेअरला 'BUY' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसने ४५९ रुपये लक्ष्य किंमत (target price) निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊसचे मत आहे की, पुढील २४ महिन्यांत कंपनीच्या शेअरचा भाव या पातळीवर पोहोचू शकतो. म्हणजेच, २९९ रुपये दराप्रमाणे कंपनीच्या शेअरचा भाव ५३ टक्क्यांनी वाढू शकतो.



(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)





© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.