अपूर्ण रस्त्यांमुळे पादचाऱ्यांची कसरत
esakal June 13, 2025 08:45 PM

पिंपरी, ता. १३ ः पिंपळे सौदागरच्या शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्ता अर्बन डिझायनिंग अंतर्गत आधुनिक करण्याचे काम वेगाने चालू आहे. ज्या भागाचा अर्धा रस्ता तयार झाला आहे. तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करताना ठेकेदाराने रस्त्याची साईडपट्टी सपाट केली नसल्याने शाळेत पायी जाणारी मुले, त्यांचे पालक, मॉनिंग वॉकसाठी कुंजीर मैदानात जाणारे ज्येष्ठ नागरिक, मैदानात कोचिंगसाठी जाणारी लहान मुले या सर्वांचे खूप हाल होतात. सोसायटीच्या रहिवाशांची प्रशासनाकडे मागणी आहे.
पावसामुळे कडेला चिखल, माती आणि राडा रोड्याचे उंचवटे, खड्डे, हे सांभाळून जाताना शेजारून कर्कश हॉर्न वाजवित वेगाने जाणारे दुचाकी, रिक्षा, चारचाकी चालक यांच्यापासून स्वत:ला वाचवीत मार्गक्रमण करावे लागते. यात भर म्हणून की काय ठेकेदाराने अनेक ठिकाणी मातीचे ढीग, जुने नवे सिमेंट पाइप, पाण्याची टाकी असे अडथळे निर्माण करून ठेवले आहेत ते वेगळे. याची खातरजमा करण्यासाठी महापालिका अधिकारी पाठवून बिल्डर कडून पायी चालण्यासाठी योग्य रस्ता करून घ्यावा, अशी पायी चालणाऱ्या शेकडो ज्येष्ठ नागरिक आणि येथील साई व्हीजन ते राजवीरपर्यतच्या सर्व सोसायटीच्या रहिवाशांची प्रशासनाकडे मागणी आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.