संजय गडदे, साम टीव्ही
अहमदाबादमध्ये विमान अपघातानंतर स्फोट होऊन २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतही अग्नितांडव पाहायला मिळालं. मुंबईच्या माहीमध्ये आग लागल्याची घटना घडली. एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आगीची भीषण दुर्घटना घडली. या आगीत होरपळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या आगीची मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आगीची मोठी दुर्घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं. माहीम परिसरात लागलेल्या या दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
एसी टेंपरेचरच्या स्फोटाने होरपळून आणि शरीर मोठ्या प्रमाणात फाटल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाचे जवान महापालिकेचे कर्मचारी आणि माहीम पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत आगीत अडकलेल्या बाकीच्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. याप्रकरणी माहीम पोलीस आणि अग्निशमन दल अधिकचा तपास करत आहेत.