अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' (Housefull 5) चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. या चित्रपटाने एक आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'हाऊसफुल 5'ने धमाकेदार ओपनिंग केली आहे. मात्र दिवसेंदिवस 'हाऊसफुल 5'च्या कलेक्शनमध्ये घसरण होताना दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.
कुमारसोबत 'हाऊसफुल 5'मध्ये रितेश आणि अभिषेकसोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे. '5' चित्रपट 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट आता लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. चित्रपटाने आठ दिवसांत 133.25 कोटी रुपये कमावले आहेत.
'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 8दिवस पहिला - 24 कोटी रुपये
दिवस दुसरा - 31 कोटी रुपये
तिसरा दिवस - 32.5 रुपये
चौथा दिवस - 13 कोटी रुपये
पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये
सहावा दिवस - 8.5 कोटी रुपये
सातवा दिवस - 7 कोटी रुपये
आठवा दिवस - 6 कोटी रुपये
एकूण - 133.25 कोटी रुपये
'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'चा बजेट तबल 225 कोटी रुपये आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.