Maharashtra Politics Live Update : इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, क्षेपणास्त्र डागली
Sarkarnama June 14, 2025 07:45 PM
Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, क्षेपाणास्त्र डागली

इस्त्रायलने गुरुवारी केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर इराणने दिले आहे. इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. शुक्रवारीरात्री उशिरा शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्त्राइलवर डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याविषयी इराणच्या लष्कराकडून निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे म्हटले आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणमधील काही भागांवर अत्याचारी, दहशतवादी व लहानमुलांची हत्या करणाऱ्या इस्त्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.