Mumbai News – भरधाव डंपरने तिघांना चिरडले, गोवंडीत संतप्त जमावाकडून रास्ता रोको
Marathi June 14, 2025 10:24 PM

भरधाव डंपरने तीन नागरिकांना चिरडल्याची घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घडली. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील सिग्नलवर शनिवारी दुपारी हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

अपघातानंतर नागरिक संतप्त झाल्याने शिवाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जमावाने घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर रास्ता रोको केला. यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूला मोठी वाहतूककोंडी झाली. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून पोलिसांनी जमावाला पांगवले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.