एओलॉजी व्हेन ज्वेल: इलोव्हरा जेल होम बेलीटेटेड?
Marathi June 14, 2025 11:25 PM

एलोवेरा अर्थात कोरफड अनेक गुणधर्म असलेली वनस्पती आहे. कोरफड जेल सनबर्न, त्वचेला मॉइश्चरायज करणे, किरकोळ जखमा भरणे आणि इतर त्वचेच्या समस्यांसाठी उपयुक्त असते. त्यामुळे त्वेचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्वचेची देखभाल करण्यासाठी हा सर्वात सोपा स्वस्त आणि मस्त उपाय सांगितला जातो. असे म्हणतात की, या औषधी वनस्पतीमध्ये जवळपास 75 प्रकारचे घटक असतात. ज्यात व्हिटॅमिन, खनिजे, सॅलिसिलिक ऍसिड, लिग्निन, सॅपोनिन यांचा समावेश असतो. हे सर्व घटक त्वचेला पोषण मिळण्यास मदत करतात. पण, बाजारात मिळणाऱ्या एलोवेरा जेलमध्ये अनेकदा केमिकल्सचा वापर करण्यात येतो, जे त्वचेचे नुकसान करणारे ठरू शकते. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी एलोवेरा जेल बनवायला हवे. कोरफडीच्या पानांपासून जेल काढणे सोपे असते.आज आपण जाणून घेऊयात एलोवेरा जेल घरी बनवण्याची सोपी पद्धत

आवश्यक घटक-

  • कोरफडीची पाने – 3 ते 4
  • बदामाचे तेल –
  • सुरी
  • चमचा
  • हवाबंद कंटेनर

बनवण्याची पद्धत –

  • कोरफडीचे ताजी पाने घ्या. ही पाने स्वच्छ धुवा.
  • यानंतर पान एका भांड्यात सरळ उभे करा आणि पानावरचे काटे आणि वरची साल काढून घ्या.
  • आता चमच्याच्या साहाय्याने पानातील गर काढून एका वाटीत ठेवा.
  • यानंतर मिक्सरच्या भांड्यात गर टाकून एकदा फिरवून घ्या.
  • तयार गरामध्ये बदाम तेलाचे 4 ते 5 थेंब तुम्ही टाकू शकता.

स्टोअर कुठे कराल?

तयार जेल तुम्हाला हवाबंद कंटेनरमध्ये भरून तुम्हाला फ्रिजमध्ये ठेवावे लागेल. हे घरगुती जेल 2 महिने तुम्ही वापरू शकता.

फायदे –

  • एलोवेरा जेल सूर्याच्या हानिकारक किरणांपासून चेहऱ्याचे संरक्षण करते. यामुळे सन टॅन कमी होऊ शकतो.
  • तुम्ही दररोज रात्री झोपण्याआधी एलोवेरा जेल त्वचेला लावलेत तर त्वचेच्या अनेक तक्रारी कमी होतील.
  • एलोवेरा जेल त्वचेवर लावल्याने मेलेनिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल.
  • त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी एलोवेरे जेल वापरणे फायद्याचे ठरेल.
  • नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी एलोवेरा जेल सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=xdtkk4o9uby

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.