आज जमाना आयपीएलचा, कमी काळात अधिक लक्ष्य गाठणं महत्त्वाचं : अशोक चव्हाण
Marathi June 15, 2025 03:24 AM

नांदेड : भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारच्या काळातील विकास कामांची गती यावर भाष्य केलं. याशिवाय मुंबई नांदेड वंदे भारत संदर्भात देखील अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या काळात विकास झाला मात्र त्यापेक्षा दुपटीनं विकास झाला गेल्या अकरा वर्षात झाल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण काय म्हणाले ?

काँगेसच्या काळात विकास झाला,  मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या अकरा वर्षात देशाचा विकास झाला. मी काँगेस मध्येच होतो. काँगेसच्या काळात विकास झाला नाही का या प्रश्नाचा रोख माझ्याकडेच आहे हे मला कळल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी मारला. काँगेसच्या काळात ही विकास झाला मात्र जो विकास मागच्या अकरा वर्षात झाला तो अधिक गतीने झाला, असं अशोक चव्हाण म्हणाले. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणं महत्त्वाचं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पर्यंत करण्याचं धोरण ठेवल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

वंदे भारतच श्रेय रावसाहेब दानवे यांचं : अशोक चव्हाण

वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड पर्यंत वाढण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. या निर्णयानंतर नांदेड मध्ये श्रेयवाद सूरू आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड पर्यंत वाढण्याचा निर्णयाचे श्रेय तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आहे, असं  खासदार अशोक चव्हाण म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी यासाठी पाठपुरावा केला. जालना ते नांदेड पर्यंत रेल्वे लाईनचे काम सुरु होते. त्यामुळे तो निर्णय आता झाला . आता कोण श्रेय घेते मला माहीत नाही. रावसाहेब दानवे यांनी 2023 सालीच ही घोषणा केली होती. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो असं अशोक चव्हाण म्हणाले.

इतर पक्षातील नेत्यांना भाजपसोबत यावं वाटतं : अतुल सावे

भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो कामाचा लेखाजोखा आज जनतेसमोर मांडला आहे. हे बघून इतर पक्षातील अनेक नेत्यांना भाजपसोबत यावं असं वाटतं असं अतुल सावे म्हणाले.  हे दोन्ही नेते देशाच्या विकासासाठी काम करतात म्हणून त्यांच्याबरोबर गेले पाहिजे असं त्यांना वाटतं, असं अतुल सावे म्हणाले. संजय राऊत सकाळी काय बोलतात ते रात्री त्यांना आठवत नाही, असंही अतुल सावे म्हणाले.  शनि देवस्थान येथील 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं त्यात 114 मुस्लिम होते. तो तिकडच्या ट्रस्टीचा विषय आहे, असं अतुल सावे म्हणाले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.