नागपूर बातम्या: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजप(BJP) यांची अत्यंत महत्वाची समन्वय बैठक आज (15 जून) नागपुरात होत आहे. संघाच्या या रेशीमबाग येथील कार्यालयात होणाऱ्या बैठकीमध्ये संघाच्या सर्व 32 संघटनांचे प्रतिनिधी ही सहभागी होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने भाजपचे महत्त्वाचे नेते व पदाधिकारी ही या बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) ही या बैठकीसाठी संघाच्या रेशीमबाग कार्यालयात पोहोचले आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत काही काळासाठी सहभागी होऊ शकतात.
संघ परिवारातील सर्व संघटनांची विशिष्ट कालावधीनंतर बैठक होत असते. त्याच मालिकेत विदर्भ प्रांत स्तरीय ही बैठक असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले आहे. आता पर्यंत आलेले आमदार आणि मंत्र्यांमध्ये राजू तोडसाम, मंत्री पंकज भोयर, आमदार संजय कुटे, किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार आमदार समीर कुणावार, डॉ नरोटी, मंत्री अशोक उईके, सुमित वानखेडे, मंत्री आकाश फुंडकर माजी खासदार हंसराज अहिर, आमदार आशिष देशमुख यांच्या सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही पोहोचलेही संघाच्या रेशीमबाग कार्यालयात पोहोचले आहे.
संघ हा नेहमीभाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की, मग राम मंदिर बांधायचा असो. सर्वपक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचं. राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे. ही दुहेरी नीती आता लोकांच्या लक्षात यायला लागली आहे.
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. पूर्वी महाराष्ट्र हा दोन गुजराती नेत्यांकरिता पाहिजे होता. आता ते तीन नेते झालेले आहे. मात्र आता जनता भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी बोलताना व्यक्त केली आहे. ते नागपुरात बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा