Narmada River : उलट्या दिशेने वाहणारी देशातील एकमेव नदी
Marathi June 19, 2025 02:24 PM

गंगा-यमुना नदीप्रमाणेच आपल्या देशातील नर्मदा नदी देखील लाखो लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. या नदीत स्नान करण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने येतात. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरातमधील महत्त्वाची नदी आहे. तुम्ही कधी मध्य प्रदेशातील उज्जैनला महाकाल आमि नंतर ओमकारेश्वरला भेट देण्यासाठी गेलात तर येथे तुम्हाला नक्कीच नर्मदा नदीचे दर्शन घडते. पण, नर्मदा नदीची एक खासियत आहे, ते म्हणजे ती उलट्या दिशेने वाहते. देशातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, मात्र, नर्मदा नदी अशी एकमेव नदी आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराच्या ऐवजी ती अरबी समुद्राला मिळते. आजच्या अजब-गजबमधून जाणून घेऊयात हे असे का घडते?

नर्मदा नदी देशातील एकमेव नदी आहे जी उलट दिशेने वाहते. या नदीला ‘आकाशाची कन्या’ असे देखील म्हणतात. नर्मदा नदी ही देशातील सात महत्त्वाच्या नद्यांपैंकी एक मानली जाते. या नदीचा उगम मखल पर्वतातील अमरकंटक येथील तलाव आणि सोनभद्र पर्वताच्या शिखरातून होतो. अमरकंटक हे मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील पुष्पराजगड अमरकंटक तहसीलमध्ये आहे. नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे एक भौगोलिक कारण आणि एक पौराणिक कारणही सांगितले जाते.

वैज्ञानिक कारण –

नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचं भौगोलिक कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅलीचा उतार विरुद्ध दिशेने आहे. यामुळे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते, असे सांगितले जाते.

पौराणिक कारण –

नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे पुराणात अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैंकी एक म्हणजे, नर्मदा आणि सोनभद्रा यांचे लग्न होणार होते. पण, लग्नाच्या काही दिवस आधी नर्मदाला समजले की, भद्राला तिची दासी जुहिली जास्त आवडते. यामुळे नर्मदेला आपला अपमान झाल्यासारखे वाटले आणि तीने मंडप सोडून विरुद्ध दिशेला जाण्याच निर्णय घेतला. नर्मदा उलट दिशेने जाताच सोनभद्राने तिला खूप विनवण्या करत थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, नर्मदा थांबली नाही. तिने आयुष्यभर कुमारी राहून उलट दिशेने वाहत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजही नर्मदा उलट दिशेने वाहते असे सांगितले जाते.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=ukbii-x95tvw

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.