फक्त 4 वर्षांत 247% ची तुफानी वाढ; Defence Stock चे 5 भागात विभाजन, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
Defence Stock to Buy : एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित असलेल्या सिका इंटरप्लांट सिस्टिम्स लिमिटेडच्या शेअर्सने रॉकेटगतीने वाढ नोंदवली आहे. बुधवारी,19 जून रोजी BSE मध्ये इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स 1537.30 रुपयांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कामकाजाच्या शेवटी, सिका इंटरप्लांटचे शेअर्स 1533.55 रुपयांवर बंद झाले. गेल्या 5 दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, गेल्या एका महिन्यात सिका इंटरप्लांट सिस्टिम्सचे शेअर्स 81 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 399.96 रुपये आहे.
4 महिन्यांत शेअर्समध्ये 247% वाढसंरक्षण क्षेत्रातील कंपनी सिका इंटरप्लांट सिस्टिम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या 4 महिन्यांत 247 टक्क्यांची जोरदार वाढ झाली आहे. सिका इंटरप्लांटचे शेअर्स 18 फेब्रुवारी 2025 रोजी 441.75 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स 18 जून 2025 रोजी 1533.55 रुपयांवर बंद झाले आहेत. या वर्षात आतापर्यंत सिका इंटरप्लांट सिस्टिम्सच्या शेअर्समध्ये सुमारे 202 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचे शेअर्स 192 टक्क्यांनी वाढले आहेत.
5 वर्षांत कंपनीचे शेअर्स 4065% वाढले चे शेअर्स गेल्या पाच वर्षांत 4065 टक्क्यांनी वाढले आहेत. संरक्षण क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स 19 जून 2020 रोजी 36.82 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स 18 जून 2025 रोजी 1533.55 रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या 4 वर्षांत सिका इंटरप्लांटच्या शेअर्समध्ये 2124 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या दोन वर्षांत सिका इंटरप्लांट सिस्टिम्सच्या शेअर्समध्ये 1166 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये 138 टक्क्यांची वाढ झाली आहे.
अलीकडेच परवाना करारसिका इंटरप्लांट सिस्टिम्स (Sika Interplant Systems) ने अलीकडेच घोषणा केली आहे की, तिने गुडरिच ॲक्च्युएशन सिस्टिम्स SAS (फ्रान्स) आणि गुडरिच ॲक्च्युएशन सिस्टिम्स (UK) यांच्यासोबत महत्त्वाचा परवाना करार केला आहे. या दोन्ही कंपन्या कॉलिन्स एरोस्पेसचा भाग आहेत.
कंपनीने शेअर्सचे केले विभाजन सिका इंटरप्लांट सिस्टिम्स लिमिटेडने आपल्या शेअर्सचे विभाजन (स्टॉक स्प्लिट) केले आहे. कंपनीने मार्च 2025 मध्ये आपले शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभागले. कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याच्या आपल्या शेअरचे 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 5 शेअर्समध्ये विभाजन केले आहे.
कंपनी काय काम करते?सिका इंटरप्लांट सिस्टिम्स लिमिटेड ही एक अभियांत्रिकी (engineering) कंपनी आहे, जी मुख्यतः भारतातील एरोस्पेस, संरक्षण (Defence) आणि ऑटोमोटिव्ह (Automotive) क्षेत्रांसाठी उत्पादने, प्रणाली आणि सेवा पुरवते.