काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना सर गंगा राम रुग्णालयातून घरी सोडण्यात आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना पोटासंबंधी त्रास सुरू झाला होता. पोटामध्ये संसर्ग झाल्याने 78 वर्षीय सोनिया गांधी यांना 15 जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Siddhant Shirsat Case : मंत्री शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत यांचे 'वेदांत'च्या लिलावातून माघारीचे पत्र नाहीछत्रपती संभाजीनगर वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप झाले. यानंतर वेदांत हॉटेल विकत घेतल्याच्या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचे संजय शिरसाट(Sanjay Shirsat)यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी जाहीर केले होते. मात्र, पालकमंत्र्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी यासंदर्भात अद्याप प्रशासनाला पत्र दिलेले नाही. दरम्यान, लिलावात निश्चित झालेल्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम भरण्याची मुदत आज (20 जून) सायंकाळीपर्यंत आहे, असे असताना अद्याप कंपनीने पैसे भरले नसल्याची माहिती समोर आली आहे.
Jammu Kashmir News : 'जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणे हा घटनात्मक अधिकार'जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळवणे ही कोणतीही सवलत नसून, तो घटनात्मक अधिकार आहे, नॅशनल काॅन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
Girish Mahajan BJP : भाजपमधील नाराजांवर काळ हाच उपाय; मंत्री गिरीश महाजनमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे भाजपमधील मूळ आणि जुने-जाणते पदाधिकारी नाराज झाले आहेत. या नाराजीवर काळ हाच उपाय असल्याची प्रतिक्रिया भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.