The Chief Ministers post is a game of numbers. Ajit Dada should become the Chief Minister…A senior NCP leader expresses this wish.
Marathi June 23, 2025 04:25 AM


पुढील आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा अजित पवार यांनी सपत्नीक मुख्यमंत्री म्हणून करावी, अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अलीकडेच विठ्ठल चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Mumbai : पुढील आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा अजित पवार यांनी सपत्नीक मुख्यमंत्री म्हणून करावी, अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अलीकडेच विठ्ठल चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले होते. आता अमोल मिटकरी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका मोठ्या नेत्याने अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.(Ajit Pawar: The Chief Ministers post is a game of numbers. Ajit Pawar should become the Chief Minister…A senior NCP leader expresses this wish.)

अमोल मिटकरी म्हणाले होते की, आम्ही पांडुरंगाला एकच साकडे घातले की यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण, पुढील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी देखील अशीच इच्छा व्यक्त करुन दाखवली आहे.

अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं : माणिकराव कोकाटे

माणिकराव कोकाटे म्हणाले की, “इच्छा असण्यात वाईट काय? मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं काय आहे?”,असे वक्तव्य त्यांनी केले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यावर भाजपमधून व महायुतीतुन काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदावर कोणाचा दावा?

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपचे गिरीश महाजन , शिंदे गटाचे दादा भुसे आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांचे देखील नाव या पदासाठी अनेक दिवसांपासून चर्चेत असताना अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचे देखील नाव नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या यादीमध्ये आले आहे. याबाबत प्रश्न विचारला असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून फार वाद नाहीत. पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा…Nitesh Rane : मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका; फडणीसांचे नाव घेत काय म्हणाले नितेश राणे?



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.