लेह-लडाख प्रवासाचे पुस्तकात वर्णन
esakal June 23, 2025 10:45 PM

भिवंडी (वार्ताहर)ः अमृतसरवरून लेह लडाखच्या प्रवासाचे वर्णन १३ वर्षीय वैभव जानीने ‘ रीड द रोड’ पुस्तकातून मांडले आहे. या पुस्तकाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने प्रवास वर्णन लिहिल्याने त्याच्या सृजनशीलेतेची प्रचिती मिळते, असे कपिल पाटील यांनी सांगितले. यावेळी वैभवने प्रवासादरम्यान केलेले टिपण आई-वडील तसेच प्रशिक्षक साक्षी यांच्यामुळे शब्दबद्ध केल्याचे सांगितले. तसेच पुस्तकातून माझ्या सोबत प्रवास करत असल्याचा आनंद वाचकांना उपभोगता येईल, असा विश्वासही व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.