लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे, त्यातील एक मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा आहे.
मोनोजित मिश्रा तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विद्यार्थी संघटनेचा (टीएमसीपी) नेता आहे.
भाजपने आरोप केला आहे की मोनोजित मिश्राचे ममता बॅनर्जी यांची मेहुणी काजरी बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संबंध आहेत.
मोनोजित मिश्रा दक्षिण कोलकात्ता लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे.
सध्या मोनोजित मिश्रा तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या (टीएमसीपी) दक्षिण कोलकाता जिल्ह्याचा सरचिटणीस आहे.
याशिवाय मोनोजित मिश्रा अलीपूर कोर्टात वकिली देखील करतो.
मोनोजित मिश्राच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार तो यापूर्वी महाविद्यालयाचा टीएमसीपी युनिट अध्यक्ष होता.
मोनोजित मिश्राचे तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि ममता बॅनर्जी यांच्या मेहुणी आणि नगरसेवक काजरी बॅनर्जी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो आहेत.