मुंबई : अकरावी प्रवेशाच्या कॅप-१ फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा काही दिवसांपासून सुरू असलेल्या घोळावर आज विभागाकडून पांघरुन टाकत ती ३० जून ऐवजी दोन दिवस अगोदर आज २८ जून रोजी जाहीर केली. या यादीत राज्यभरातून अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांपैकी अर्ध्याच म्हणजे केवळ ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थी विविध महाविद्यालये अलॉट झाली आहे. यापैकी ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाली आहेत. तर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपेकी तब्बल अर्ध्याहून अधिक अशा ६ लाख ३९ हजार १०१ विद्यार्थ्यांना एकही महाविद्यालय अलॉट झाले नाही.
अकरावीच्या पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमानुसार तब्बल ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली असून त्यांना ३० ते ७ जुलै या कालावधीत संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. पहिल्या पसंतीक्रमातील विद्यार्थ्यांना आपले प्रवेश रद्द करता येणार नाहीत. अन्यथा ते पुएील फेरीत अर्ज करून शकणार नाही. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेकदा प्रवेश आणि पहिल्या फेरीचे वेळापत्रक बदली करण्यात आल्याने याचा मोठा मन:स्थाप विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते, मात्र ते पाळता आले नाही. यासाठीच्या संकेतस्थळातच मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्माण झाल्याचे ऐनवेळी समोर आले होते. यामुळे ही यादी ३० जून रोजी जाहीर केली जाईल असे सांगत विभागाने सुधारीत वेळापत्रकाही जाहीर केले होते, मात्र आज ऐनवेळी ही यादी जाहीर केली. यातही आलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावती आढळून आल्या आहेत.
शाखानिहाय कॉलेज अलॉटकला शाखेच्या 2 लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी तर वाणिज्य शाखेच्या 2 लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत.
बारावी पास झाला, हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत होता, पण नियतीनं डाव साधला अन् दिव्यांग माय-बापाचा आधारच हरवला पसंतीक्रमानुसार प्रवेशविद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी 10 पर्याय उपलब्ध होते. त्यानुसार 4 लाख 57 हजार 841 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला आहे. तर 77 हजार 99 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या दुसरा पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला.
अर्जांच्या संख्येत मोठी तफावतदोन दिवसांपूर्वी शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या कॅप-१ प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले होते. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीच्या माहितीत १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांनी कॅप-१ फेरीसाठी अर्ज केल्याची माहिती दिली आहे. यामुळे अर्ज केलेल्या २ लाख ५ हजार २९० विद्यार्थ्यांचे काय झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे याविषयी विभागाकडून कोणतेच स्पष्टीकरण देण्यात न आल्याने यावर येत्या काळात गोंधळ वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.पहिल्या फेरीतील पसंतीक्रमानुसार गुणवत्ता यादी,
पहिल्या फेरीतील पसंतीक्रमानुसार गुणवत्ता यादीकला - १४९७९१
वाणिज्य - १३९६०२
विज्ञान - ३४२८०१
एकूण - ६३२१९४
पहिल्या फेरीसाठी आलेले अर्जकला - २३१३५६
वाणिज्य - २२४९३१
विज्ञान - ६०९७१८
एकूण - १०६६००५
शून्य फेरीचे असे झाले प्रवेशव्यवस्थापन - प्रवेश ७७५६, अर्ज३२९५३
इन हाऊस - प्रवेश २६५२१, अर्ज६४४७७
अल्पसंख्यांक - प्रवेश २६२१०, अर्ज ४७७९५
एकूण - प्रवेश ६०४८७, अर्ज १४५२२५