Georai News : श्वास बंद पडल्याने माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; दोन वर्षापूर्वीच पत्नीचा देखील असाच झाला होता मृत्यू!
esakal June 29, 2025 05:45 AM

गेवराई (जि. बीड) - तालुक्यातील सेलू येथील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा श्वास बंद झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. दिलीप बाबूराव डोंगरे (६१) रा. सेलू, ता. गेवराई असे मृत झालेल्याचे नाव आहे.

दिलीप डोंगरे यांना श्वसनाचा आजार होता.मात्र वेळीच औषधोपचार केल्याने काहीशा प्रमाणात बरा झाला होता. मात्र, आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटूबियांनी त्यांना तात्काळ उपचारास नेत असताना रुग्णालयात जाण्यापूर्वीच दिलीप डोंगरे यांचा मृत्यू झाला.

दरम्यान,दोन वर्षापासून त्यांची पत्नी सुवर्णा डोंगरे यांचा देखील श्वास घेण्यास त्रास झाल्याने मृत्यू झाला होता. मृत दिलीप डोंगरे यांच्या पाश्चात्य तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून अचानक झालेल्या मृत्यूने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.